Border 2 First Song Launch: 2026 ला सुरूवात झाली. बॉलिवूडमध्ये सध्या बॉर्डर 2 (Border 2) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल. सनी देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा लूकरिलीज झाला. तसेच बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझरहीरिलीज झाला. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं. या सिनेमातील गाण्याचे लाँच कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात 'घर कबआओगे' हे गाणं लाँच करण्यात आलं. 'घरकबआओगे' या गाण्याशी अनेकांच्या भावना जोडल्या आहेत. या गाण्याच्या लाँच कार्यक्रमात अनेक जण भावुक झाले. हा कार्यक्रम राष्ट्रीय गौरव आणि सामूहिक भावनेचा क्षण बनला होता.
'घर कबआओगे' या आयकॉनिक गाण्याच्या व्हिडिओमध्ये सनी देओल, वरूण धवन, दिलजीतदोसांझ आणि अहानशेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हे गाणे रूपकुमार राठोड, सोनू निगम, अरिजीत सिंग, विशाल मिश्रा आणि दिलजीतदोसांझ यांनी गायले आहे. व्हिडिओमध्ये वरूण धवन एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्याची सुरूवात कलाकार सहकारी सैनिकांसह करतात. हळूहळू सर्व जण एकत्र येतात, तसेच आपल्या प्रियजनांची आठवण काढून गाणं गातात.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेता सनी देओल जेव्हा फ्रेममध्ये येतो, तेव्हा हे गाणे भावनिक वळण घेते. सनी देओल पत्र वाचत असतो. पत्र वाचत असताना सनी देओलचे डोळे वेदना आणि अश्रुंनी भरतात. सनी इकडे तिकडे भटकत असतो. विचारांमध्ये हरवतो. त्याचे जुने दिवस त्याला आठवतात. सैन्यातील जुने मित्रही त्याला आठवतात. या गाण्यात दिलजीत दोसांझ वायुसेनेचा पायलट आणि अहान शेट्टी नौदलाच्या अधिकार्याची भूमिका साकारत आहे. हा कार्यक्रम फक्त गाण्याचे लाँचिंग नव्हते. तर बॉर्डर 2साठी एक महत्त्वाचा टप्पाही होता. जिथे देशाच्या सीमेवर वास्तविक जीवनातील शौर्य एकत्र दाखवण्यात आले.
या गाण्यात आपल्याला महिला कलाकारांची झलकही पाहायला मिळते. मोना सिंह सनी देओलसोबत, सोनमबाजवादिलजीतदोसांजसोबत, आन्या शर्मा अहानशेट्टीसोबत आणि मेधा राणा वरूण धवनसोबत दिसत आहे. हे गाणे ऐकून तुम्हाला 'संदेसेआतेहै' या गाण्याची आठवण येईल. हे गाणे ऐकून तुम्ही देखील भावनिक व्हाल. बॉर्डर २ या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी दत्ता आणि निधी दत्ता यांनी केली आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित हा चित्रपट 23 जानेवारी2026 ला सिनेमागृहातप्रदर्शित होईल.
