Border 2 OTT : यंदाच्या वर्षाची सुरुवात सनी देओलच्या बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाने झाली. 29 वर्षांपूर्वी आलेल्या ‘बॉर्डर’ या कल्ट वॉर ड्रामाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. थिएटरमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता हा चित्रपट OTT वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा जेपी दत्ता यांच्या 1997 मधील सुपरहिट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या आधी, 23 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित झालेला.
OTT रिलीजची अधिकृत घोषणा
23 जानेवारी 2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेल्या ‘बॉर्डर 2’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या OTT रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होणार आहे.
‘या’ दिवशी पाहता येणार चित्रपट
20 मार्च, शुक्रवारपासून ‘बॉर्डर 2’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी आता घरबसल्या हा देशभक्तीने भारलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा जेपी दत्ता यांच्या 1997 मधील सुपरहिट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या आधी, 23 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित झाला.
दरम्यान चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी स्पष्ट केलं की, ‘बॉर्डर 3’ हा त्यांचा आणि अनुराग सिंह यांचा पहिला पुढचा प्रोजेक्ट नसेल. ‘बॉर्डर 2’ आधी जो चित्रपट रखडला होता, तो आधी पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. “त्या पुढच्या चित्रपटानंतर आम्ही पुन्हा ‘बॉर्डर’कडे वळू,” असंही त्यांनी सांगितलं.
दमदार स्टारकास्ट आणि कथा
या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरली.
‘गदर 2’नंतर सनी देओलचा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. ‘बॉर्डर 2’नेही कमाईच्या बाबतीत मोठी कामगिरी केली. अहवालानुसार, चित्रपटाने भारतात सुमारे 341 कोटींची नेट कमाई केली, तर जागतिक स्तरावर 464 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला.आता OTT वर रिलीज होत असल्याने ‘बॉर्डर 2’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागवण्यासाठी सज्ज आहे.
