Yami Gautam: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. बाला, अ थर्सडे यांसारख्या चित्रपटांमध्ये यामीनं काम केलं. विक्की डोनर या चित्रपटामधून यामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यामीनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलं. 


यामीनं मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मला व्हॅलेंटाईन डेचा दिवस अजिबात आवडत नाही. त्या दिवशी मी खूप अस्वस्थ व्हायचे. कारण बाबा अनेकदा कामानिमित्त शहराबाहेर असायचे. त्यामुळे आम्ही ट्यूशनला रिक्षानं जात होतो. पण मुलं बाईकवर जात होती. ती मुलं रिक्षाच्या मागे यायची. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. मला आठवते कीय मी त्यांच्याकडे ती मुलं टक लावून पाहायचे. मी पूर्णपणे दुर्लक्ष करायचे.' 


पुढे यामीनं सांगितलं, 'मला आठवतं, एकदा दोन मुलं बाईकवरुन जात होते.  कदाचित मी त्यांना  काही प्रतिक्रिया देत नव्हते म्हणून ते चिडले होते. ते काहीही बोलत होते. मी ज्या रिक्षामध्ये बसले होते, त्या रिक्षाच्या बरोबरीने ती मुलं दुचाकी चालवू लागली. त्या बाईकवरील एका मुलानं माझा हात पकडायचा प्रयत्न केले. त्यामुळे मी त्याला मारलं. मला माहित नाही माझ्यात हिंमत कुठून आली? मी ती मुलाच्या हातावर मारलं. तो मुलगा खूप घाबरला होता.  '  






'टोटल सैयप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'बदलापूर', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3', 'बत्ती गुल मीटर चालू', 'उरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये यामीनं काम केलं आहे.  'चांद के पार चलो' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं.यामी 4 जून 2021 रोजी सिनेदिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Happy Birthday Yami Gautam : यामी गौतमला व्हायचं होतं आयएएस अधिकारी; अभिनयाची गोडी लागली अन्...