Netflix Weekly Top Trending Web Series: नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. आता नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नेटफ्लिक्सनं या आठवड्यातील टॉप-10 ट्रेंडिग वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. पाहा संपूर्ण लिस्ट-
क्लास
नेटफ्लिक्सवरील या आठवड्यात ट्रेडिंग सीरिजच्या यादीतील पहिल्या क्रमांकावर क्लास ही सीरिज आहे. या सीरिजच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
Wednesday
Wednesday या सीरिजचे दिग्दर्शन टिम बर्टन यांनी केले आहे. जेना ऑर्टेगानं या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप-10 वेब सीरिजच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लॉकवूड अँड कंपनी
लॉकवूड अँड कंपनी या सीरिजमध्ये एक आगळी वेगळी गोष्ट दाखवण्यात आली आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर इंग्रजी वेब सीरिजचा दबदबा दिसत आहे. ही सीरिज तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
न्यू एम्स्टर्डम
मेडिकल ड्रामावर आधारित असलेल्या न्यू एम्स्टर्डम या वेब सीरीजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ही वेब सीरिज चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
गिन्नी और जॉर्जिया-2
गिन्नी और जॉर्जियाच्या पहिल्या सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गिन्नी और जॉर्जिया-2 ही सीरिज या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
खाकी- द बिहार चॅप्टर
अभिनेता करण टॅकरच्या खाकी- द बिहार चॅप्टर ही सीरिज अनेक जण बिंच वॉच करत आहेत. या सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
फौदा-4
फौदा या सीरिजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. या सीरिजच्या चौथ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. फौदा-4 ही सीरिज सातव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
गिन्नी और जॉर्जिया-सिझन वन
गिन्नी और जॉर्जिया या सीरिजच्या दुसऱ्या सीरिज प्रमाणेच दुसरा सिझन देखील ट्रेड होत आहे. ही सीरिज आठव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
नेटफ्लिक्सच्या या यादीत क्रॅश कोर्स इन रोमान्स आणि फिजिकल-100 या दोन सीरिज नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
पाहा संपूर्ण यादी:
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: