मुंबई : व्होडाफोन आणि आयटेल या दोन टेलिकॉम कंपन्या एकत्र येत 4G स्मार्टफोन आणला आहेत. ‘A20’ असे या स्मार्टफोनचे नाव असून, किंमत जिओ फोन आणि एअरटेल इंटेक्स अॅक्वा लायन्स N1 या स्मार्टफोनच्या किंमतींएवढी आहे.


व्होडाफोन-आयटेलच्या ‘A20’ चे फीचर्सही आकर्षक आहेत. एक जीबी रॅम आणि 4 इंचाचा WVGA डिस्प्ले या स्मार्टफोनला आहे.

किंमत किती? कॅशबॅकची ऑफर काय?

‘A20’ स्मार्टफोनची मूळ किंमत 3,690 रुपये आहे. मोबाईल खरेदी करण्यावेळी ही पूर्ण किंमत द्यावी लागेल. मात्र यावर 2,100 रुपयांचं कॅशबॅक आहे. मात्र कॅशबॅकची रक्कम मोबाईल खरेदी केल्याच्या 18 महिन्यांच्या अंतराने मिळेल. म्हणजेच 18 महिन्यांनी 900 रुपये, त्यानंतरच्या 18 महिन्यांनी 1200 रुपये. त्यामुळे तसे पाहायला गेल्यास, हा स्मार्टफोन 1,590 रुपयांना पडतो.

त्याचसोबत, या स्मार्टफोनसाठी प्रत्येक महिन्याला 150 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. हे रिचार्ज 36 महिने करावे लागेल. ज्यांना शक्य आहे, ते 36 महिन्यांचं रिचार्ज आधीच एकत्रित करु शकतात. म्हणजे एकत्रित रिचार्ज केल्यास 5,400 रुपये भरावे लागतील.

या स्मार्टफोनसाठीच्या या सर्व ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत उपलब्ध असतील.

A20 स्मार्टफोनचे फीचर्स :

- 4 इंचाचा WVGA (480x800) डिस्प्ले

- 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर

- 1 GB रॅम

- 8 GB इंटरनल स्टोरेज

- मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 32 GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा

- 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

- 0.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

- 1500 mAh क्षमतेची बॅटरी

- डार्क ब्ल्यू, शॅम्पेन गोल्ड आणि सिल्व्हर या रंगांमध्ये स्मार्टफोन उपलब्ध