Vivek Agnihotri Announced Next Movie Parva : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाच्या माध्यमातून चर्चेत येणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'पर्व' (Parva) हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पर्व' हा सिनेमा तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा महाभारतावर आधारित आहे. 


विवेक अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सीन वॉर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री यांचा 'पर्व' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासंदर्भात अपडेट्स जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 






विवेक अग्निहोत्री यांचा 'पर्व' हा सिनेमा एस एल भैरप्पा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. कन्नड भाषेतील या पुस्तकात महाभारताची गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. महाभारतातील पात्रांभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. 'पर्व' या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. महाभारतावर आधारित असलेल्या या सिनेमावर विवेक अग्निहोत्री यांनी काम सुरू केलं आहे. 


तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार 'पर्व'


विवेक अग्निहोत्री यांनी 'पर्व' सिनेमाची घोषणा केल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा एक नव्हे तर तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी 'पर्व' सिनेमाची घोषणा केल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. 






विवेक अग्निहोत्रींच्या सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Vivek Agnihotri Movies)


विवेक अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सीन वॉर' आणि 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने देशभरात चांगलीच कमाई केली. एकीकडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचं कौतुक झालं. तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी या सिनेमाचे खास शो आयोजित केले. 


संबंधित बातम्या


Vivek Agnihotri : "त्याने नशेत माझ्याबरोबर..."; विवेक अग्निहोत्रीवर महिलेचा गैरवर्तनाचा आरोप