Vishwas Patil : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करुन सांगितले की, 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते.' आता लेखक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. "स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले आहे." असं या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी लिहिलं.
विश्वास पाटील यांची पोस्ट
विश्वास पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "संभाजीराजांना 'धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे! कागदपत्रे साक्ष देतात! 'स्वराज्यरक्षक संभाजी' हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सीरियलसाठी वापरले इतकेच"
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख "धर्मवीर" असाच करत आला आहे. ग.दि माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा "धर्मभास्कर" असा केला होता. अन्यथा "स्वराज्यरक्षक" हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही.' विश्वास पाटील यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी इतिहासाचे अनेक दाखले देखील दिले आहेत.
'अस्सल कागदपत्रे सांगतात की, गेली 105 वर्ष महाराष्ट्र शंभूराजांना "धर्मवीर" या लाडक्या नावाने ओळखतो आहे. स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता, हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे.आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.' असंही या पोस्टमध्ये विश्वास पाटील यांनी लिहिलं.
Vishwas Patil share post on Amol Kolhe : पाहा विश्वास पाटीस यांची संपूर्ण पोस्ट
पानिपत, संभाजी या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन विश्वास पाटील यांनी केले. तसेच त्यांना या कादंबऱ्यांसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: