Vinod Khanna Birth Anniversary : मनोरंजन विश्वात 70च्या दशकांत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची जादू पसरलेली होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील बॉलिवूड गाजवू लागले होते. याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आणि अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. या अभिनेत्याचं नाव होतं विनोद खन्ना (Vinod Khanna). मनोरंजन विश्वात खलनायक म्हणून एंट्री करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारात मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं.


अभिनेते विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर (आताचे पाकिस्तान) येथील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील व्यापारी होते. भारत-पाक फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. विनोद खन्ना हे सिनेसृष्टीतील असे कलाकार होते, ज्यांनी चित्रपटात नायकासोबतच खलनायकाच्या भूमिका साकारून भरपूर प्रसिद्धी मिळवली. विनोद खन्ना चित्रपटात आपल्या व्यक्तिरेखेवर वेगवेगळे ​​प्रयोग करायचे. यामुळेच त्यांनी खलनायक बनूनही प्रेक्षकांची मने जिंकली.


अशी झाली मनोरंजन विश्वात एन्ट्री!


विनोद खन्ना शाळेत असताना खूप लाजाळू स्वभावाचे होते. एकदा त्यांच्या शिक्षकाने त्यांना एका नाटकांत जबरदस्ती भाग घ्यायला लावला होता. शाळेतील याच नाटकाने त्यांचं मतपरिवर्तन झालं. इथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना वडिलांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. विनोद खन्ना यांच्या वडिलांना त्यांनी अभिनेता व्हावं असं मुळीच वाटत नव्हतं. आपल्या मुलाने व्यवसाय सांभाळावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, शेवटी विनोद खन्ना यांच्या आईने समजूत घालत समेट घडवून आणला.


1968 मध्ये सुनील दत्त यांनी त्यांना त्यांच्या 'मन का मीत' चित्रपटात खलनायक साकारण्याची संधी दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द अशीच सुरु ठेवली.


मनोरंजन विश्वातून संन्यास घेत गाठला आश्रम


विनोद खन्ना यांनी 1982 दरम्यान चित्रपट कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असतानाच थेट संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. आलिशान घर, पैसा सोडून त्यांनी आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. संपत्ती आणि प्रसिद्धी असली, तरी आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे, असे सतत त्यांना वाटायचे. यामुळेच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेतील अध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमात गेले. येथे ते पाच वर्षे राहिले. ओशोंच्या आश्रमात ते संन्यासी झाले. विनोद खन्ना अमेरिकेत जाऊन ओशोंच्या आश्रमातील माळीच्या कामापासून ते टॉयलेट साफ करण्यापर्यंतची सर्व कामे करायचे. मात्र, पुन्हा भारतात आल्यानंतर ते मनोरंजन विश्वात सक्रिय झाले.


हेही वाचा :


विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं!


Heropanti 2: Heropanti 2 साठी Nawazzudin Siddqui करणार Vinod Khanna ची नक्कल