Vikrant Rona OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) गेल्या अनेक दिवसांपासून 'विक्रांत रोना'मुळे (Vikrant Rona) चर्चेत आहे. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

Continues below advertisement

'विक्रांत रोना' डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज

'विक्रांत रोना' हा सिनेमा हिंदीत डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. तर कन्नड भाषेत हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 'विक्रांत रोना' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. 

'विक्रांत रोना' या सिनेमात किच्चा सुदीपसह बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसदेखील मुख्य भूमिकेत आहे. 'विक्रांत रोना' या रहस्यमय सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळत आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने किच्चा सुदीपचे चाहते आनंदी झाले आहेत. 

Continues below advertisement

'विक्रांत रोना' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

'विक्रांत रोना' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. 28 जुलैला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 95 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

संबंधित बातम्या

Vikrant Rona Box Office Collection : किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल; 'शमशेरा' ठरला फ्लॉप

Vikrant Rona : 'विक्रांत रोणा' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; जाणून घ्या कलेक्शन