Vijay Devarakonda Car Accident : दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा नुकताच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोबतच्या साखरपुड्यामुळे चर्चेत होता. याच दरम्यान घडलेल्या एका अपघातामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुट्टपती येथून हैदराबादला जाताना त्याच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने, हा अपघात किरकोळ स्वरूपाचा होता आणि विजय देवरकोंडाला कोणतीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा रविवारी आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत पुट्टपती येथे गेला होता. सोमवारी तो हैदराबादला परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. ही घटना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवली परिसरात घडली. विजयच्या कारला एक बोलरो गाडीने धडक दिली.
या अपघातात विजयच्या कारचे काहीसे नुकसान झाले. त्याच्या कारच्या पुढच्या बाजूला धडक बसल्याने ती बाजू चेपली असल्याचं दिसून येतंय. मात्र, कारमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही दुखापत झाली नाही.
Vijay Devarakonda Accident : जोरदार धडक, पण दुखापत नाही
कारचा अपघात झाल्यामुळे विजय देवरकोंडाला पुढचा प्रवास त्याच्या मित्राच्या गाडीतून करावा लागला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी रस्त्यावर वर्दळ होती, पण कोणतीही गंभीर जखम किंवा जीवितहानी झाली नाही. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.
अलीकडेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली होती. दोघांमधील नात्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच हा अपघात घडल्याने चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विजय सुरक्षित असल्याची बातमी समजताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
Who Is Vijay Devarakonda : कोण आहे विजय देवरकोंडा?
पूर्ण नाव: विजय साई देवरकोंडा
जन्म: 9 मे 1989
जन्मस्थान: अचंपेट, तेलंगणा (भारत)
शिक्षण: लिटल फ्लॉवर हायस्कूल, हायदराबाद व बॅचलर पदवी – बड्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स
कारकीर्द
विजय देवरकोंडाने 2011 मध्ये Nuvvila या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. 2015 मध्ये आलेल्या Yevade Subramanyam या चित्रपटामुळे त्याला ओळख मिळाली. परंतु त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती अर्जुन रेड्डी (2017) या चित्रपटामुळे.
या चित्रपटातील बिनधास्त, तीव्र आणि भावनाप्रधान अभिनयामुळे तो रातोरात स्टार बनला. यानंतर त्याने गिता गोविंदम, डीयर कॉम्रेड, टॅक्सिवाला, वर्ल्ड फेमस लव्हर आणि लायगर या चित्रपटांमध्ये काम केले.
पुरस्कार आणि कामगिरी
Filmfare Award (Telugu) – Arjun Reddy साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता
Forbes India 30 Under 30 (2019) मध्ये समावेश
स्वतःची "King of the Hill Entertainment" ही प्रोडक्शन कंपनी स्थापन केली
वैयक्तिक जीवन
विजय देवरकोंडाचे अभिनेत्री रश्मिका मंदाना सोबतचे नाते गेल्या काही वर्षांत चर्चेत आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
ही बातमी वाचा: