Vedat Marathe Veer Daudle Saat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या आगामी चित्रपटासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकाच मंचावर आले होते.  यावेळी अक्षय कुमारनं या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबाबत भावना व्यक्त केल्या. 


काय म्हणाला अक्षय कुमार?


अक्षय कुमार म्हणाला की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पहिल्यांदाच भेटत आहे. मला खूप आनंद झाला. महेश मांजरेकर याने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात मी काम करणार आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. मी सर्वांना सांगू इच्छितो की, मला या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. ते मला म्हणाले की, तू ही भूमिका कर. मी ही भूमिका साकारणार ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी खूप जबाबदारीचं  काम आहे.' 


 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.   


अक्षय कुमारचे 2022 मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. सम्राट पृथ्वीराज, कटपुतली, रक्षाबंधन हे अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची निर्मिती 200 कोटीच्या बजेटमधून करण्यात आली. पण या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 61.90 रुपये कमावले आहेत. आता अक्षयचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच अक्षयच्या चाहत्यांना मिळेल.



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत