Rishabh Pant Health: क्रिकेटपटू ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला.अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. ऋषभचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ऋषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) आईनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.  'सर्वांनी प्रार्थना करा.' , असं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून उर्वशीची आई मिरा रौतेला यांनी नेटकऱ्यांना केलं आहे. 


Rishabh Pant Health:  मिरा रौतेला यांची पोस्ट


मिरा रौतेला यांनी सोशल मीडियावर ऋषभ पंतचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही निरोगी आहात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचं नाव मोठं करत आहात. सिद्धबलीबाबा तुमच्यावर आशीर्वादाची वर्षाव करतील. सर्वांनी प्रार्थना करा.' 


Rishabh Pant Health:  नेटकऱ्यांच्या कमेंट्स


मिरा रौतेला यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही टेंशन घेऊ नका, जावई बापू लवकर बरे होती.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'पोस्टमध्ये जावई बापू लिहायचं राहिलं.' 'कदाचित हे इन्स्टाग्राम अकाऊंट उर्वशी हँडल करते' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं दिलं. 


पाहा पोस्ट: 






सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद पाहायला मिळाला होता. एका मुलाखतीत उर्वशीने ऋषभ पंतचा उल्लेख केला होता. तर, यावरून चिडलेल्या ऋषभ पंतने तिला ‘ताई बस कर.. आता अजून किती खोटं बोलशील’ असा टोला लगावला होता. यावर उत्तर देताना उर्वशीने ऋषभला ‘छोटू भय्या’ म्हटलं होतं. गेल्या काही दिवांपासून उर्वशी आणि ऋषभच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


 वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Rishabh Pant Accident : "आधी भावाकडे जा"; ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर नेटकऱ्यांकडून उर्वशी रौतेला ट्रोल