Uorfi Javed Bollywood Debut :   आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलने अनेकदा चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. उर्फी जावेद आता चित्रपटात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. दिबाकर बॅनर्जी यांच्या चित्रपटातून उर्फी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.  


उर्फी जावेद सातत्याने आपल्या ड्रेसिंग आणि लूकने चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येते. त्याशिवाय, आपल्या सडेतोड वक्तव्यानेही उर्फी चर्चेत आली होती. आता ती बॉलिवूड चित्रपटात झळकणर आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी 'एलएसडी 2' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.


काय आहे 'एलएसडी 2'ची कथा?


'एलएसडी 2' चित्रपटात इंटरनेट जगतातील प्रेमाची कथा आहे. सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असलेल्या भवतालामध्ये प्रेम आणि नातेसंबंध दर्शवणारी एक इरोटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात उर्फीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. चित्रपटाची कथा ही  उर्फीच्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी असल्याचे बोलले जात आहे. 'एलएसडी 2' हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एलएसडी' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 







मुख्य अभिनेत्रीने चित्रपट सोडला


'LSD 2' मध्ये तुषार कपूर आणि मौनी रॉय यांचा कॅमिओ असल्याचे वृत्त आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि कल्ट मुव्हीजच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात निमृत कौर अहलुवालिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार होती. अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण चित्रपटात अधिक प्रमाणात इंटिमेट सीन्स  असल्याने चित्रपट सोडला.