मुंबई: कधी गोनपाटाचा ड्रेस कधी सेफ्टी पीनचा तर कधी बांबूच्या काड्यांचा ड्रेस घालून फिरणारी उर्फी नेहमीच तिच्या या अतरंगीपणामुळे चर्चेत असते.. पण सध्या हीच उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर जरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीये. बोल्ड दिसणाऱ्या उर्फीचा सध्याचा चेहरा जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ती ओळखूच येणार नाही. नेमकं काय झालंय उर्फीच्या चेहऱ्याला पाहूया या रिपोर्टमधून...
फॅशनच्या नावाखाली नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद सध्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. सुजलेले ओठ आणि लालबुंद चेहरा... ही तीच बोल्ड दिसणार उर्फी आहे. उर्फीचे हे रुप पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल ना हे काय झालं?
नऊ वर्षांपूर्वी लिफ फिलर सर्जरी
याला कारण आहे सुंदर दिसण्याची एक सर्जरी. उर्फीने 9 वर्षांपूर्वी लिप फिलर्स केले होते. मात्र आता तिने तिचे हे लिप फिलर्स काढण्याचा निर्णय घेतला. चुकीच्या ठिकाणी हे लिप फिलर्स लावल्याचं म्हणत ते विरघळवण्याचा निर्णय घेतला. ही ट्रीटमेंट करतानाचा एक व्हिडीओ उर्फीने शूट केला आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
या व्हिडीओत उर्फी काही इंजेक्शन्स आपल्या ओठांवर घेताना दिसतेय. जस जसे ती हे इंजेक्शन घेते तसा तिचा चेहरा अधिकच सूजल्याचं दिसतंय. ज्या ट्रिटमेंटमुळे उर्फीचे हे हाल झालेत ती लिप फिलर ट्रिटमेंट आहे तरी काय पाहूया.
Urfi Javed Lip Filler Surgery : लिप फिलर म्हणजे काय?
ओठ जरा अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेलसारखं पदार्थ इंजेक्ट करणं.
यापूर्वी अशी ट्रिटमेंट अनेक बॉलिवूड कलाकारांनी केली आहे.
- सुष्मिता सेन
- अनन्या पांडे
- अनुष्का शर्मा
- प्रियांका चोप्रा
- मनिषा लांबा
- कतरिना कैफ
खरंतर सिनेकलाकारांसाठी प्लास्टिक सर्जरी काही नवी नाही. पण या अशा सर्जरी तुमचं सौंदर्य वाढवण्यापेक्षा ते बिघडवण्याचंच काम जास्त करतायत असं नाही का वाटत? आता उर्फीचंच पाहा गेली होती सौंदर्य खुलवायला, पण आली तोंड सुजवून.
ही बातमी वाचा:
