मुंबई:बॉलिवूडमध्ये अफेअर असणे ही गोष्ट काही नवीन नाही. प्रसिद्ध हिरो किंवा हिरोईनचे कुणाशी अफेअर सुरू आहे याच्या सुरस कथा रंगवल्या जातात, त्यामुळे त्या कलाकारही चर्चेत राहतात. अशाच एका अफेअरची चर्चा आता बॉलिवूडमध्ये सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि काजोल (Kajol) यांचा एक कॉमन एक्स-बॉयफ्रेंड (Common Ex Boyfriend) असल्याचा खुलासा स्वतः ट्विंकलने केला आहे. त्यांच्या लोकप्रिय शो ‘Too Much With TwinkleAnd Kajol’ च्या नवीन एपिसोडमध्ये हा मजेदार किस्सा समोर आला. माझ्या आणि काजोलच्या आयुष्यात एक असा मुलगा आहे ज्याला आम्ही दोघींनीही डेट केलं होतं, असं ट्विंकल खन्नाने म्हटलं.

टू मच विथ ट्विंकलअँड काजोल या शोमध्ये अभिनेता विकी कौशल आणि कृती सेनन पोहचली होती. त्यांच्याशी गप्पा मारताना ट्विंकलने हा खुलासा केला. ट्विंकलने तिच्या आणि काजोलच्या एक्स बॉयफ्रेंडचा विषय काढताच काजोल घाबरुन म्हणाली की, 'शांत राहा, प्लीज, मी तुला विनंती करते.' हे ऐकून सेटवर उपस्थित सर्व जण जोरात हसू लागले आणि शोचा माहोलच बदलला.

TwinkleKajolCommon Ex Boyfriend : काजोलट्विंकलचा कॉमन एक्स

काजोल आणि आपला एक्स बॉयफ्रेंड एकच असल्याचा खुलासा ट्विंकल खन्नाने केला. ट्विंकलने त्याचे नाव जरी उघड करण्यास नकार दिला असला तरी तिच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. शोमध्ये या प्रसंगाने सर्वांचे मनोरंजन झाले. दोघीही अभिनेत्री अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांचे 'कॉमन एक्स' नेमके कोण याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

Kriti Sanon Crush Reveal: कृत सेननचा क्रश

या एपिसोडमध्ये अभिनेत्री कृत सेनन आणि अभिनेता विक्की कौशल गेस्ट म्हणून उपस्थित होते. यावेळी कृतने कबल केले की सध्या तिचा एक स्पेशल क्रश आहे. कृत म्हणाली की, “मी मनाने खूप रोमँटिक आहे. मला प्रेमात असणं आवडतं. आणि माझा क्रश इंडस्ट्रीतून नाही… ही चांगली गोष्ट आहे.”

कृती सेनन सध्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या बिझनेसमन कबीर बहिया यांना डेट करत असल्याच्या अफवा आहेत, मात्र याची अधिकृत पुष्टी नाही.

Too Much With Twinkle And Kajol: काजोलट्विंकलचा शो हिट

काजोल आणि ट्विंकलचा हा शो 25 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर (Prime Video) स्ट्रीम होत आहे. या शोमध्ये आतापर्यंत सलमान खानआमिर खान, अक्षय कुमारसैफ अली खान, वरुण धवनआलिया भट्ट, गोविंदाचंकी पांडे, जावेद जाफरीकरण जौहर, सोनाक्षी सिन्हामनीष मल्होत्रा, अनन्या पांडेफराह खान अशा अनेक स्टार जोड्या दिसल्या आहेत.

ही बातमी वाचा: