'इतका मोठा निर्णय घेणं कठीण होतं. मनात अनेक शंका-कुशंका होत्या. लोक काय म्हणतील हा प्रश्न होताच. एकदा फ्लाईटमध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी भेट झाली. त्यांनी विचारलं, लग्नाबाबत काय विचार आहे. मी म्हटलं, लग्न तर ठरत नाहीये. अरेंज मॅरेज करायचं नाही आणि प्रेम तर जुळत नाही.' असं उत्तर दिल्याचं तुषारने सांगितलं.
'लग्न नाही केलंस, तरी पिता होऊ शकतोस, असं प्रकाश झा यांनी सुचवलं. त्यांनीही सिंगल पेरेंट म्हणून एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता मोठी झाली असून आनंदात आहे. त्यांनी मला एका कुटुंबाचा नंबर दिला. मी त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. मी माझ्या घरी याविषयी सांगितलं, तेव्हा सर्वांनीच पाठिंबा दिला.' असं तुषार म्हणाला.
तुषार कपूर खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नाआधीच बाबा
'बाबा म्हणाले की लोक चार दिवस काहीतरी बोलतील आणि मग गप्प बसतील. तू कुठल्याच गोष्टीची काळजी नको करुस. एकताने सर्वाधिक सपोर्ट केला' असं तुषार सांगतो.
तुषार शूटिंगला जाताना लक्ष्यला सोबत घेऊन जातो. मात्र सेटवर नाही, तर त्या शहरात नेतो. सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्याचं पालनपोषण व्हावं, अशी तुषारची इच्छा आहे.
आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचं उदाहरण होतं. तुषार हा सिंगल फादर होणारा पहिलाच अभिनेता ठरला. त्यानंतर करण जोहरनेही सरोगसीतून जुळ्या मुलांना जन्म दिला.