Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तिच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. पण 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेचं शूटिंग मात्र थांबलं होतं. पण मालिकेच्या काही भागांचं बॅकअप असल्याने प्रेक्षकांना मात्र मालिका पाहताना काहीही फरक जाणवला नाही.
तुनिषा शर्माला शिझानने आत्महत्येस भाग पाडल्याने शिझान खान (Sheezan Khan) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषा आणि शिझान दोघेही 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे आता ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण आता या मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
सेटवरचं वातावरण कसं आहे?
तुनिषा शर्माच्या मालिकेतील एका सहकलाकाराने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून 'अली बाबा : दास्तान - ए - काबुल' या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मालिकेतील कलाकारांना शूटिंगसाठी पुन्हा एकदा सेटवर बोलवण्यात येत आहे. शूटिंगला सुरुवात झाली असली तरी तुनिषाची आठवण येत असल्याने सेटवर नकारात्मक वातावरण आहे".
'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेतील अभिनेत्री सपना ठाकूर पुढे म्हणाली,"तुनिषाच्या निधनाने मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रचंड दु:ख झालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्हा सर्वांसोबत तुनिषा आनंदात शूटिंग करत होती. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे दोन्ही कलाकार सध्या सेटवर नाहीत. कदाचीत आता मालिकेच्या कथानकात बदल होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे".
तुनिषाच्या शर्माच्या आत्महत्येने 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेसंबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. शूटिंग करताना प्रत्येकाला भीती वाटत आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेचा सेट बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिका बंद होणार नसून मालिकेच्या कथानकात बदल होईल.
संबंधित बातम्या