OTT Movies And Web Series This Week : जून (June) महिन्याचा तिसरा आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) या सिनेमासह सलमानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा समावेश आहे. 


सीक्रेट इनवेजन (Secreat Invasion)
कधी प्रदर्शित होणार? 21 जून
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार


'सीक्रेट इनवेजन' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. यात सैमुअल जॅक्सन आणि निक फ्यूरी मुख्य भूमिकेत आहेत.


क्लास ऑफ 09 (Class Of 09)
कधी प्रदर्शित होणार? 21 जून
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार


'क्लास ऑफ 09' ही अमेरिकन अॅक्शन, ड्रामा असलेली सीरिज आहे. अमेरिकेतल्या गुन्हेगारीवर भाष्य करणारी ही मालिका आहे. 


ग्लॅमरस (Glamorous)
कधी प्रदर्शित होणार? 21 जून
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


'ग्लॅमरस' ही सीरिज आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही विनोदी सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल. 


स्कल आयलँड (Skull Island)
कधी प्रदर्शित होणार? 22 जून
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


'स्कल आयलँड' ही सीरिज उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जपानी सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल. 


सोशल करेंसी (Social Currency)
कधी प्रदर्शित होणार? 22 जून
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


'सोशल करेंसी' या सीरिजमध्ये पार्थ समथान, भाविन भानुशाली, रुही सिंह, वागमिता सिंह, रुबी राय, मृदुल मधोक, साक्षी चोप्रा आणि आकाश मेहता मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhaii Kisi Ki Jaan)
कधी प्रदर्शित होणार? 23 जून
कुठे प्रदर्शित होणार? झी 5


सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 23 जूनला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. 


टीकू वेड्स शेरू (Tiku Weds Sheru)
कधी प्रदर्शित होणार? 23 जून
कुठे प्रदर्शित होणार? प्राइम व्हिडीओ


कंगना रनौतच्या प्रॉडक्शन अंतर्गत निर्मिती होत असलेला 'टीकू वेड्स शेरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


'आदिपुरुष चित्रपटावर बंदी घाला'; केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदारांचं पत्र