Tripti Dimri On Bold Scene : ॲनिमल चित्रपटातील बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. ॲनिमल चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या बोल्ड सीनची खूप चर्चा झाली. ॲनिमल चित्रपटात रणवीर कपूरसोबत दिलेल्या बेड सीनमुळे तृप्ती रातोरात प्रसिद्ध झाली खरी, पण यासाठी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. बोल्ड सीन दिल्याने तिच्यावर खूप टीका झाली.
बोल्ड अन् सेन्शुअस अशी तृप्ती डिमरीची ओळख
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची चाहत्यांमध्ये बोल्ड इमेज बनली आहे. ॲनिमल चित्रपटातील बेड सीन किंवा बॅड न्यूज चित्रपटातील इंटिमेट सीन यामुळे तिची एक बोल्ड इमेज तयार झाली आहे. बोल्ड सेन्शुअस इमेजबद्दल तृप्ती डिमरीने प्रतिक्रिया दिली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेल्या विचित्र प्रतिमेपासून तिचं मत समोर आलं आहे. तृप्ती डिमरीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं की, तिला या बोल्ड इमेजपासून तिला दूर जायचं आहे का?
बोल्ड इमेजबद्दल तृप्ती डिमरीची प्रतिक्रिया
अभिनेत्री तृप्ती डिमरीने चित्रपटांमधील भूमिकांच्या निवडीबद्दल उघडपणे तिचे मत व्यक्त केले. 'अॅनिमल' आणि 'विकी विद्या का तो व्हिडिओ' मधील पात्रांची निवड करण्यामागील कारणही तिने स्पष्ट केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्ती डिमरीने नकारात्मक प्रतिसाद आणि ट्रोलिंगबद्दल मत व्यक्त केलं आहे.
"...हाच माझा उद्देश"
यावर तिने उत्तर दिलं की, मी सध्या जे काही घडत आहे, त्याच्यासोबत पुढे जात आहे. काही गोष्टी काम करतील, तर काही गोष्टी नाही. गोष्टी चालल्या तरी ठिक आणि नाही चालल्या तरी ठिक आहे. मी नेहमीच प्रत्येकाला आवडू शकत नाही, प्रत्येकाला खूश करु शकत नाही. असे काही लोक असतील ज्यांनी माझं काम आवडेल, तर काहींना आवडणार नाही. तिने पुढे सांगितलं की, मला नवनवीन आव्हाने स्वीकारायला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची पात्रं करत राहणं, हाच माझा उद्देश आहे. सेटवर येऊन काहीतरी आव्हानात्मक करावं असे मला नेहमीच वाटतं.
तृप्ती डिमरीचे आगामी चित्रपट
सध्या तृप्ती डिमरी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या 'उस्तरा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर दिसणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याशिवाय, तृप्ती आशिकी 3 चित्रपटात दिसणार असल्याचीही चर्चा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :