TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून वैभव मांगलेंची एक्झिट!


विश्वविक्रमी बालनाट्य अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ हे चिमुकल्या प्रेक्षक वर्गाच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या नाटकाने बालरंगभूमीला पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान दिले होते. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी साकारलेल्या चिंचि चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, आता वैभव मांगले यांनी या भूमिकेतून आणि या नाटकातून एक्झिट घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे.


सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'विक्रांत रोना' ओटीटीवर रिलीज


 दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप गेल्या अनेक दिवसांपासून 'विक्रांत रोना'मुळे चर्चेत आहे. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 'विक्रांत रोना' हा सिनेमा हिंदीत डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.


'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात मनवा नाईक दिसणार सोयराबाईंच्या भूमिकेत


अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईकने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 


'आयएनटी'चं बिगुल वाजलं


 जून महिन्यात कॉलेज सुरू झाल्यानंतर नाट्यवेड्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 'आयएनटी' या मानाच्या एकांकिका स्पर्धेचे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष एकांकिका स्पर्धा होत नव्हत्या. पण आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा त्याच जल्लोषात एकांकिका स्पर्धा पार पडणार आहेत. 'आयएनटी' ही एकांकिका विश्वातील अत्यंत मानाची एकांकिका स्पर्धा आहे. या मानाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 20 सप्टेंबरला पार पडणार आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत


'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगत होती. पण आता ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


'ड्रीम गर्ल 2'ची रिलीज डेट जाहीर


बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या चर्चेत आहे. आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.  टीझर आऊट झाल्याने आयुष्मानचे चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


'ब्रह्मास्त्र'ने बॉक्स ऑफिसवर पार केला 300 कोटींचा टप्पा


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. जगभरात या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


निळू फुलेंचं आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारणार!


मनोरंजन विश्वात सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात सुरू आहे. राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांतील अनेक दिग्गजांवर बायोपिक बनवले जात आहेत.  याशिवाय चित्रपट कलाकारांचेही बायोपिक सध्या बनवले जात आहेत. या यादीत आणखी एका चित्रपट व्यक्तिमत्त्वाचे नाव जोडले गेले आहे आणि ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले. आता प्रख्यात अभिनेते निळू फुलेंच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘टाइमपास 3’ ओटीटीवर रिलीज


मराठी सिनेमा ‘टाइमपास’ला कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. या फ्रँचाईझीमधल्या पहिल्या दोन सिनेमांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी तयार केलेल्या तिसऱ्या सिनेमालाही प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. टाइमपास 3 ने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. 


जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरण चित्रपटाच्या माध्यमातून येणार समोर


अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. आता या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याची बातमी समोर येत आहे.