TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू; गाठला 300 कोटींचा टप्पा


अभिनेते कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर  300 कोटींची कमाई केली आहे. 


‘हसता हा सवता’ 17 जून रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


 नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने  आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ 17 जूनला दु. 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.


'तुम्हा रसिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत!'; झी-मराठीची पोस्ट चर्चेत


झी-मराठी या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशच्या  लग्न सोहळ्याचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या भागामध्ये काही झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे आता झी-मराठीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या मालिकेच्या विशेष भाग पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.


‘वाय’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच 'वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. 


 न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकले सिद्धू मुसेवाला


प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संगीतक्षेत्रासह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. आता सिद्धू मुसेवाला यांच्या जन्मदिनी न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर त्यांच्या गाण्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. गाण्यांचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले होते.   


कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट


 बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकले आहे. आतापर्यंत या सिनेमाने 171.52 कोटींची कमाई केली आहे. 


बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट आता ओटीटीवर होणार रिलीज


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी होतं. पण चित्रपटानं मात्र जवळपास 65 कोटींची कमाई केली. आता बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या हा चित्रपट ओटीटी रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. 


शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्सचं सेवन केल्याचं निष्पन्न


बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'सिद्धांत कपूरसह  सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं', अशी माहिती एका वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. 5 स्टार हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतलं आहे. 


आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर


बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता  आर माधवनचा ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून तो या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकला.


'स्क्विड गेम' सिझन 2 ची घोषणा, दिग्दर्शकाकडून चाहत्यांसाठी खास संदेश


 नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने जबरदस्त वेब सीरिजने चाहत्यांच्या मनोरंजनात वाढ करत त्यांना प्रचंड वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील अनेक लोकप्रिय वेब सीरिजच्या पुढील सिझनसाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम'च्या सिझन 2 ची घोषणा झाली आहे. 'स्किड गेम'च्या पहिल्या सिझनमध्ये 7 गेम 456 स्पर्धक आणि एक विजेता... अशी कहाणी पाहायला मिळाली.