Tiger 3 Viral Video : बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर-3 (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. 


टायगर-3 च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने शेअर केला. आहे. टायगर-3 च्या सेटवरील फोटो शेअर करुन एका त्या नेटकऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'इमरान हाश्मी टायगर-3 च्या सेटवर. सगळ्यात खतरनाक व्हिलन' 






टायगर-3 च्या सेटवरील व्हायरल व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा चित्रपट वेगळ्याच लेव्हलचा असणार आहे.' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली आहे की, 'इमरान हाश्मी वर्ल्ड सिनेमामध्ये रिमार्केबल इम्पेक्ट करणार आहे.'














YRF चं स्पाय युनिव्हर्स


यश राज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समध्ये शाहरुखचा पठाण, हृतिकचा वॉर आणि सलमानच्या टायगर या चित्रपटांचा समावेश आहे. यामधील टायगर या चित्रपटाचा तीसरा भाग दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं म्हटलं जात आहे. 


एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांप्रमाणेच टायगर-3 ला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया,  या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


सलमान आणि कतरिना स्टारर 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग 2012मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाच्या पाच वर्षानंतर म्हणजेच 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘एक था टायगर’च्या 11 वर्षांनंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Emraan Hashmi Upcoming Movies : ‘टायगर 3’ ते ‘सेल्फी’, येत्या वर्षांत इमरान हाश्मीचे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!