Kedar Shinde : राज्याला परतीच्या पावसाने झोडपलं आहे. राज्यभरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच पुढील काही दिवस मुंबईसह राज्यभर मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करणारी केदार शिंदे (Kedar Shinde) यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


केदार शिंदे यांनी लिहिलं आहे," हॅलो वरुणराजा... आता बास करा की... आधीच दोन वर्ष परिस्थिती बिकट म्हणून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय... आणि तुम्ही रोज हजेरी लावून सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतताय... प्रत्येक गोष्ट त्या त्या सीझनला झालेली चांगली असते. पाऊस हवाच हो... पण तो आता या महिन्यात नको... आणि पुढेही नको...". 


केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या अवकाळी पावसाने खूप नुकसान होतंय. पण निसर्गाचं संतुलन बिघडण्यामागे कारण काय असावं? कुठून ना कुठून लिंक माणसालाच कनेक्ट होणार...ज्ञान...विज्ञान...विनाश". 






केदार शिंदेंचा 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. लवकरच त्यांना 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा', 'जेजुरीच्या खंडेराया', 'या गो दांड्यावरून' ही शाहिरांची अजरामर गाणी या सिनेमात असणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ च्या चित्रीकरणाला वाई येथे सुरुवात; केदार शिंदेनं व्यक्त केल्या भावना