Telugu Music Composer Raj Death: राज-कोटी या लोकप्रिय तेलुगू संगीतकार जोडीमधील थोटकुरा सोमराजू उर्फ राज यांचे रविवारी (21 मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज यांच्य निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत.
चिंरजीवींनी ट्वीट शेअर करुन व्यक्त केला शोक
अभिनेते चिंरजीवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'राज-कोटी या लोकप्रिय संगीत दिग्दर्शक जोडीमध्ये 'राज' यांचे निधन झाले आहे, हे कळल्यावर धक्का बसला. अतिशय हुशार असलेल्या राज यांनी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात माझ्या चित्रपटांसाठी अनेक अप्रतिम गाणी देऊन माझ्या चित्रपटांच्या यशात मोठा वाटा उचलला आहे. राज यांच्या अकाली निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांचे सर्व चाहते आणि कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना.' राज आणि कोटी या जोडीने चिरंजीवी यांच्या 'कैदी 786' आणि 'मुट्टा मेस्त्री' या चित्रपटांना चित्रपटांसाठी संगीत दिले होते.
दिग्दर्शक साई राजेश यांनी देखील ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
राज आणि कोटी ही तेलुगूमधील लोकप्रिय संगीकारांची जोडी. दोघांनी 1982 च्या तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दोघांनी जवळपास 300 चित्रपटांना संगीत दिलं. यमुदिकी मोगुडू (1988), जयम्मु निश्चयमू रा (1989), प्रिजनर नं. 786 (1988), बावा बामरीदी (1993), मुथा मेस्त्री (1993) आणि हॅलो ब्रदर (1994) या चित्रपटांना त्यांनी लंगीत दिलं.
हेही वाचा :