Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Baahubali 3 : पिक्चर अभी बाकी हैं... बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट; कंगुवाच्या निर्मात्याचा खुलासा


Baahubali 3 Update : एस.एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटाने भारतीय सिनेमामध्ये एक नवीन पायंडा रचला. या फ्रेंचायझीचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. बाहुबली चित्रपटामुळे भारतीय सिनेमाला जगभरात पुन्हा एक नवी ओळख मिळाली. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शन, वीएफएक्स, पटकथा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. बाहुबली 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतरच बाहुबली 3 चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. आता बाहुबली चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या निर्मात्याने मोठा खुलासा केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Armaan Malik Accident : बिग बॉस फेम अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला; VIDEO शेअर करत सांगितला घडला प्रकार


Armaan Malik Car Accident : बिग बॉस ओटीटी सीझन 3 फेम युट्युबर अरमान मलिक याचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अरमान मलिकचा भीषण कार अपघात झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. भीषण अपघातातून अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका यांच्यासह ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. अरमान मलिकने  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत अपडेट शेअर केली आहे. युट्युबरअरमान मलिकने दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एन्ट्री घेतली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Bigg Boss 18 : सलमान खानच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे 'वीकेंड का वार'चं शूटींग रद्द?


Bigg Boss 18 : बिग बॉस 18 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो आहे. बिग बॉस 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. दरम्यान, आता बिग बॉस 18 च्या आगामी 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान 'वीकेंड का वार'चं शूटींग करणार नसल्याची चर्चा आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Oviya Leaked Video : प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक, 17 सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ; अभिनेत्रीची पोलिसांत धाव


Actress Oviya MMS Leaked Viral Video : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांचे एमएमएस व्हायरल होत असतात. आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा कथित एमएमएस लीक झाल्याने एकच खळबळ माजली आहे. तमिळ अभिनेत्री ओविया हिचा कथित एमएमएस लीक झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कारणामुळे तमिळ अभिनेत्री ओविया हेलन चर्चेत आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


टीव्हीवर 'संस्कारी सून', ओटीटीवर येताच 'या' अभिनेत्रींनी दिले बोल्ड सीन्स, पाहून चकित व्हाल


OTT Content : ओटीटीवर अनेक बोल्ड वेब सीरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. टीव्हीवरील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केलं. अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी OTT वर येताच खूप इंटिमेट सीन दिले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...