Telly Masala : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं ते 'या' आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Hollywood Actor Johnny Wactor : धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
Hollywood Actor Johnny Wactor Dies : हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर (Actor Johnny Wactor Dies) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या जॉनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉनी वॅक्टर हा अवघ्या 37 वर्षांचा होता. या घटनेनंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anant Ambani Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत; दिग्गज मंडळी इटलीला रवाना
Anant Ambani Radhika Merchant Second Pre Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज आहेत. अनंत-राधिकाच्या क्रूज पार्टीसाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Payal Kapadia FTII : ''पोरीनं कान्स गाजवलं, आता तरी खटला मागे घ्या''; ऑस्कर विजेत्या कलाकाराचं FTIIला आवाहन
Payal Kapadia FTII : आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes 2024) भारताची विजयी पताका फडकवणारी दिग्दर्शिका पायल कपाडिया (Payal Kapadia) सध्या चर्चेत आहे. कान्स महोत्सवात पायलच्या चित्रपटाने प्रतिष्ठेचा ग्रँड प्रिक्स पुरस्कारावर आपली मोहोर उठवली आहे. 'ऑल वी इमेजिन एज लाइट' (All We Imagine as Light) या चित्रपटाने पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून पायल कपाडिया आणि चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑस्कर विजेता कलाकार रसुल पोकुट्टी याने आता पायल आणि इतर विरोधातील खटला मागे घेण्याची आवाहन FTII ला केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) दर आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. मे महिन्याचा शेवटचा आठवडाही प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षीत वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. 28 मे 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेहसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला 24 तासदेखील अपुरे पडतील. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video) आणि झी 5 (Zee 5) सह वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत. कॉमेडी, अॅक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bollywood Actress : मलायका अरोरा ते करीना कपूर; बॉलिवूड अभिनेत्रींचं फुटवेअर कलेक्शन पाहून व्हाल हैराण; किंग खानच्या पत्नीने सर्वांनाच टाकलंय मागे
Bollywood Actress Footwears Collection : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नेहमीच वेगवेगळ्या फुटवेअरमध्ये दिसून येतात. प्रत्येक इव्हेंटला त्यांनी परिधान केलेलं फुटवेअर लक्षवेधी असतं. त्यांच्या चपला, सँडल्स, शूजची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ असते. गुच्ची, डोर, वर्साचे सारख्या महागड्या ब्रँडचे फुटवेअर त्या परिधान करतात. अनेक अभिनेत्रींची घरात फुटवेअर कलेक्शनची विशेष खोली आहे. या यादीत करीना कपूर (Kareena Kapoor), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha), मलायका अरोरा (Malaika Arora) आणि गौरी खानसह (Gauri Khan) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्रींच्या फुटवेअर कलेक्शनमध्ये हजारो ते लाखो रुपयांच्या किंमतीचे 300 जोड्यांपेक्षा अधिक फुटवेअर उपलब्ध आहेत.