Tabu on Shah Rukh Khan : बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणजेच शाहरुखसोबत (Shah Rukh Khan) काम करण्याची अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. अनेक अभिनेत्रींनी ती संधी फार लवकरच मिळते तर काहींना बराच काळ वाट पाहावी लागते. पण या सगळ्यात अभिनेत्री तब्बू मात्र बरीच लांब आहे. कारण तब्बू आणि शाहरुखने आजवर लीड म्हणून कधीच एकत्र काम केलं नाही. शेवटचे हे दोघे 'ओम शांती ओम' या सिनेमासाठी एकत्र आले होते. पण त्यानंतरही मात्र पुन्हा कधीच एकत्र दिसले नाही.
शाहरुख आणि तब्बूने एकत्र काम का केलं नसेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना अनेकदा पडतो. पण त्याचं उत्तर काही त्यांना आजवर मिळालं नव्हतं. पण आता यावर तब्बूनेच स्वत: भाष्य केलं आहे. तसेच तिने शाहरुखसोबत सिनेमे का केले नाहीत, याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. तब्बूने नुकतीच गलाटा इंडियाला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं आहे.
तो अभिनेता भेटतो त्याच्यासोबत काम करावं लागतं - तब्बू
मी कितीही म्हटलं की, सिनेमात तुम्हाला सुक्योर सह-अभिनेता भेटणं महत्त्वाचं जरी असलं तरीही तो तुम्हाला भेटलचं असं नसतं. त्यामुळे जो भेटतो त्याच्यासोबत काम करावं लागतं. मी निर्माती नाही, दिग्दर्शक नाही,लेखकही नाही. तसंच शाहरुखचा पुढचा चित्रपट कोणासोबत करायचा हेही मी ठरवत नाही. त्याचप्रमाणे पुढे कोणता चित्रपट बनणार आहे किंवा मला कोणता चित्रपट ऑफर होणार आहे हे मला माहीत नाही. मी फक्त त्या चित्रपटांनाच हो किंवा नाही म्हणू शकतो जे मला ऑफर केले जातात.
तब्बू आणि शाहरुखने एकत्र काम का केलं नाही - तब्बू
शाहरुख आणि तब्बू आजवर एकत्र काम का केलं नाही, यावर उत्तर देत तब्बूने म्हटलं की, आम्हाला एकत्र चित्रपटांची ऑफर आली पण काहींना मी नकार दिला तर काहींना शाहरुखने नकार दिला. त्यामुळे शाहरुखसोबत सिनेमे करणं, ही संधी कधी मिळालीच नाही. पण मला आणि शाहरुखला एकत्र काम करताना पाहण्याची अनेकांना इच्छा आहे, हे ऐकून खरंच खूप छान वाटतं.
ही बातमी वाचा :
Vicky Kaushal : लव्ह बर्ड्स विकी कौशल-कतरिना कैफ एकत्र चित्रपटात झळकणार, अभिनेत्याने दिले संकेत