Taapsee Pannu Wedding :  धुळवडीच्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत (Mathias Boe) विवाहबद्ध झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता तापसीचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत तापसी आणि मॅथियास दोघेही दिसत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. 


बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रियकर मॅथियास बो यांचा 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये विवाह झाल्याचे वृत्त आहे. या वृत्तांनुसार, तापसी आणि मॅथियासच्या लग्न सोहळ्यात त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय मित्र परिवार उपस्थित होता. या दोघांचा विवाह सोहळा शीख आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने पार पडल्याचे बोलले जात आहे. दोघांच्या विवाह सोहळ्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोघेही जण आपल्या मित्रांसोबत धुळवड साजरी करताना दिसले. 


दोघांनी साजरी केली धुळवड


ब्लर या चित्रपटात तापसी पन्नूसोबत झळकलेला अभिलाष थपलियालने 25 मार्च रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तापसी आणि  मॅथियास बोसह त्यांचे मित्र दिसत आहेत. 






युजर्सने म्हटले, "अरे... तापसी की मांग में सिंदूर!"


हा फोटो पाहून युजर्सकडून कमेंट्स आल्या. एका युजरने  तापसीने माथ्यावर दिसणारे हे सिंदूर नाही. तर, एकाने तापसीचे लग्न झाले हे आम्हाला आजच कळलं असल्याचे म्हटले. 


विवाह सोहळ्यात मोजकेच आमंत्रित... 


दोघांचा विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. लग्नाशी संबंधित कार्यक्रम हे 20 मार्चपासून सुरू झाले होते. आपल्या लग्नाची मीडियामध्ये चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही जोडप्यांनी खबरदारी घेतली होती. हे दोघेही मीडिया आणि लाइमलाइटपासून अंतर ठेवणारे असल्याचेही या सूत्राने म्हटले. तापसी पन्नूच्या या विवाह सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. सिनेइंडस्ट्रीमधून अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लो यानांच आमंत्रित करण्यात आले होते. अनुराग कश्यपने तापसीची भूमिका असलेल्या मनमर्जियां, दोबारा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. 


 






कोण आहे तापसीचा नवरा...


प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने  2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.  2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा  प्रशिक्षक आहे. 


इतर संबंधित बातम्या :