Taali Twitter Review: अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen)   'ताली'  (Taali)  ही वेब सीरिज काल (15 ऑगस्ट) जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.'ताली'ही वेब सीरिज पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या वेब सीरिजचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे.


एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "माँ होना कोई जेंडर नही, फिलिंग है , गौरीचा हा दमदार डायलॉग मनाला भिडला."






'श्रीगौरी सावंत यांची भूमिका साकारणाऱ्या सुष्मिता सेनचे कौतुक. प्रत्येक क्षणात त्यांचे समर्पण दाखले गेले आहे.रवी जाधव यांच्या दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमला मनापासून सलाम!' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे.






एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सुष्मिता सेनने या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे आणि खूप छान अभिनय केला आहे. आऊटस्टँडिंग!'










दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तसेत क्षितीज पटवर्धन हे या चित्रपटाचे लेखक आहेत.  या चित्रपटामध्ये सुष्मिता सेनसोबतच नितेश राठोड, अंकुर भाटिया, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर, विक्रम भाम आणि अनंत महादेवन  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. गौरी सावंत यांचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या सीरिजमधील सुष्मिताच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Gauri Sawant ON Taali : "आपलीच 'टाळी' जेव्हा जोरात वाजते.."; 'ताली' पाहिल्यानंतर गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया