Sushant Singh Rajput Flat : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुशांतचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आता अडीच वर्षानंतरही फ्लॅटच्या मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

Continues below advertisement

सुशांत राहत असलेला फ्लॅट आता त्या फ्लॅटच्या मालकाला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही. ब्रोकरने या फ्लॅटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"हा सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे. या फ्लॅटची किंमत दरमहा पाच लाख रुपये आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच वर्ष होऊनही हा फ्लॅट रिकामाच आहे. कोणीही या घरात राहायला तयार नाही". 

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ब्रोकर रफिफ मर्चंट म्हणाले,"लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरत आहेत. याच फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याचं लोकांना कळतं तेव्हा ते फ्लॅट पाहायलादेखील येत नाहीत. तसेच कोणी हा फ्लॅट विकत घ्यायला तयार नाही". 

रफिफ मर्चंट पुढे म्हणाले,"फ्लॅटच्या मालकाला आता हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही". अशाप्रकारे सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्या फ्लॅटसाठी भाडेकरू मिळत नाही आहेत. लवकरच हा फ्लॅट विकला जावा अशी मालकांची इच्छा आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मित मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आजही त्याच्या आठवणीत चाहते भावूक होतात. आज तो या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. पण त्याच्या कुटुंबियांनी त्याची हत्या झाल्याचं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या

Video : ‘तो माझ्यासाठी सगळं काही होता...’, सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर! पाहा व्हिडीओ...