Suraj Kumar Injured : दाक्षिणात्य अभिनेता सुरज कुमार (Suraj Kumar) सध्या चर्चेत आहे. रस्ते अपघातात अभिनेत्याने उजवा पाय गमावला आहे.  म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर अभिनेत्याचा अपघात झाला आहे. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सुरजचा अपघात कसा झाला? 

सुरज कुमार 25 जून 2023 रोजी संध्याकाळी म्हैसूरवरुन उटीला बाईकने जात होता. त्यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना त्याचा तोल गेला. गुंडलुपेट तालुक्यातील हिरीकाठी गेटजवळ दुपारी चार वाजताच्या सुमारात अभिनेत्याला एका टिप्पर लॉरीने धडक दिली. त्यानंतर त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांना लगेचच शस्त्रक्रिया करावी लागली. दरम्यान त्याचा उजवा पाय त्यांना कापावा लागला. सुरज कुमार हा डॉ. राजकुमार यांच्या पती श्रीमती पर्वतम्मा यांचा पुतण्या आहे.  

सुरज कुमारने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याचं नाव ध्रुवान असं ठेवलं. 2019 साली त्याने रघु कोवी दिग्दर्शित सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. सुरज कुमारचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला. सुरजच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सुरजच्या अपघातानंतर शिव राजकुमार आणि त्यांची पत्नी गीता रुग्णालयात त्याला भेटायला आले होते. 

सुरजने नुकताच सोशल मीडियावर त्याच्या आगामी कन्नड सिनेमाचा फोटो शेअर केला होता. त्याचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्याचा आगामी सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी होईल, अशी त्याला आशा आहे. तसेच त्याच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनदेखील आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. कोच्चीतील एका रुग्णालयात त्याला दाखल केले असून लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टरांनी काही दिवस त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 'विलायथ बुद्ध' असे त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

संबंधित बातम्या

Hema Malini आणि Dharmendra च्या लग्नाबद्दल अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश म्हणाल्या,"मी हेमा मालिनीच्या जागी असते तर असं पाऊल..."