Raj Kundra Bail In Pornography Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडून पॉर्नोग्राफी प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयाने राज कुंद्रासह (Raj Kundra) अन्य चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कोर्टाकडून दिलासा मिळालेल्या इतर आरोपींमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Shilpa Shetty) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा समावेश आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अश्लील व्हिडीओ डिस्ट्रीब्यूट केल्याचा आरोप असून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


न्यायालयाने सर्व आरोपींना तपासात सहकार्य करण्याचे दिले निर्देश 


मंगळवारी न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि  बी.व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने सर्व आरोपींना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने सांगितले की, "पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर, याचिकाकर्त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ शकतो असे आमचे मत आहे''. एका आरोपीची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील आर बसंत म्हणाले की, या प्रकरणी यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी तपासात सहकार्य करत आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात राज कुंद्राला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.






राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये झाली होती अटक 


दरम्यन, शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती आणि वर्षाच्या अखेरीस त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. एका महिलेने काही गंभीर आरोप केल्यानंतर राज आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. राज याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक), 292 आणि 293 (अश्लीलता  आणि अश्लील जाहिराती आणि प्रदर्शनांशी संबंधित) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये शर्लिन चोप्रा (Shilpa Shetty) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांना सहआरोपी करण्यात आले आहे.