Sunny Deol announces Border 2 :   1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारीत असलेल्या 'बॉर्डर' (Border) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर 2' चित्रपटाची (Border 2) आज अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटाचा अनाउसमेंट टीझर लाँच करण्यात आला आहे. तब्बल 27 वर्षानंतर आता मेजर कुलदीप रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.


1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला पोस्टवर मूठभर भारतीय सैन्याने आपल्या हिमतीने, शौर्याने पाकिस्तानच्या फौजांचा पराभव केला. लोंगेवालाच्या युद्धावर आधारीत असलेली गोष्ट बॉर्डर चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटात सनी देओल, सुनिल शेट्टी, जॅकी श्रॉफ,  अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा समावेश होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाची क्रेझ आजही कायम असून त्यातील गाणी लोकप्रिय आहेत. 


आता, याच 'बॉर्डर'चा सिक्वेल बॉर्डर-2 प्रदर्शित होणार आहे. 'गदर-2'मधून बॉलिवूडमध्ये झोकात पुनरागमन करणारा अभिनेता सनी देओलने 'बॉर्डर-2'चा अनाउंसमेंट टीझर लाँच केला आहे. 'बॉर्डर-2'मध्ये सनी देओलची मुख्य भूमिका असणार आहे. हा बॉलिवूडचा मोठा युद्धपट असणार असल्याची चर्चा आहे. 


 







सनी देओलकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. सफर, लाहोर 1947, बॉर्डर 2 आणि गदर 3 या चित्रपटाचा समावेश आहे.