Sukesh Chandrashekhar News : 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जेलमधून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा प्रेमपत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने 'प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ आहे' असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय, असंही सुकेशने जॅकलिनला म्हटलं आहे. 

दरम्यान, जॅकलिन फर्नांडिस हिने न्यायालयात अर्ज करून सुकेशविरोधात 'माफीची साक्षीदार' (approver) होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिचा अर्ज मंजूर झाल्यास ती सरकारी साक्षीदार बनून सुकेशविरुद्ध महत्त्वाची माहिती आणि पुरावे देऊ शकते.

Sukesh Chandrashekhar Love Letter Controversy : तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो

सुकेशने आपल्या पत्राची सुरुवात 'बेबी बोट्टा बोम्मा' अशी करत जॅकलिनला 'माझी जॅकी' असं संबोधलं आहे. 'तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. तू माझी आहेस आणि मी कायम तुझाच आहे' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jacqueline Fernandez Approver Application : जॅकलिनचा मोठा निर्णय

जॅकलिनने कोर्टात अर्ज दाखल करुन सुकेश चंद्रशेखर याच्या विरोधात माफीची साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. जॅकलिन फर्नांडिसने तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आणि सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माफीच्या साक्षीदाराचा दर्जा दिल्यास या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आणू, असंही तिने म्हटल्याची माहिती आहे. 

जॅकलिनच्या या निर्णयामुळे प्रकरणाला मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रवर्तन संचालनालयाने (ED) या अर्जावर आक्षेप घेतला असून तो अस्पष्ट असल्याचं म्हटलं आहे.

Sukesh Chandrashekhar Court Hearing Update : पुढील सुनावणी 8 मे रोजी

या प्रकरणात पटियाला हाउस कोर्टात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 8 मे रोजी होणार आहे. ईडीने कोर्टाकडे उत्तर सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला असून न्यायालयाने ती मागणी मान्य केली आहे.

Money Laundering Case : सुकेश अद्याप जेलमध्ये

सुकेश चंद्रशेखर सध्या फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये जेलमध्ये असून यापूर्वीही त्याने जॅकलिनला अनेक वेळा पत्रं लिहिली आहेत. या पत्रांमध्ये तो तिच्यावरील प्रेम आणि समर्थन व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे.

ही बातमी वाचा: