प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, बॉलिवूडमध्ये झळकलेला मराठी चेहरा- राकेश बापट यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर पल्लवी पाटील, अंगद म्हसकर या सिनेमात झळकणार आहेत. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
'सविता दामोदर परांजपे' हा सायको-थ्रिलर चित्रपट 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
'प्रादेशिक चित्रपटाच्या निर्मितीत मला प्रचंड रस आहे. माझा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाल्यामुळे मी मराठी मुलगा आहे. जर सुबोध भावेने मला मराठी शिकवलं, तर मला मराठी चित्रपटात भूमिका करायलाही नक्की आवडेल' असं जॉन अब्राहम ट्रेलर लाँचच्या वेळी म्हणाला.
पाहा ट्रेलर :