Subhedar Movie Box Office Colletion : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'सुभेदार' सिनेमामुळे नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) त्यांच्या 'बापल्योक' (Baaplyok) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.


'सुभेदार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Subhedar Marathi Movie Box Office Collection)


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'सुभेदार' या बहुचर्चित सिनेमान रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशीदेखील हा सिनेमा एक कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे वीकेंडला हा सिनेमा तीन कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकतो.


'सुभेदार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. उत्तम कथा, पटकथा, दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट आणि त्यांचा कमाल अभिनय, तंत्रकुशल टीम आणि चांगले दिग्दर्शन अशा सर्व गोष्टी जुळून आल्याने शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'सुभेदार' हा सिनेमा 350 हून अधिक सिनेमागृहांतील 900 पेक्षा जास्त शोजसह देशातल्या विविध शहरांत आणि इतर सहा देशांत प्रदर्शित झाला आहे. 


'सुभेदार'साठी नागराज मंजुळेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय


नागराज मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुतकर्ते असलेला 'बापल्योक' हा सिनेमा आधी 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. पण त्याचदरम्यान 'सुभेदार' सिनेमा प्रदर्शित झाल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील मंडळी नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात हे नागराज मंजुळे यांच्या एका कृतीने दाखवून दिलं आहे. 






नागराज मंजुळेंचा 'बापल्योक' कधी प्रदर्शित होणार? (Baaplyok Movie Release Date)


'बापल्योक' हा सिनेमा 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. मकरंन माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’ या सिनेमाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. 


संबंधित बातम्या


Subhedar : 'सुभेदार' चित्रपट झाला रिलीज; चाहत्यांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल