मुंबई : अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेटनं गौरवण्यात येणार आहे. हैदराबादेतील एका विद्यापीठानं शाहरुखला डॉक्टरेट जाहीर केली आहे. 26 डिसेंबरला सन्मानपूर्वक ही पदवी देण्यात येणार आहे.
हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दू यूनिव्हर्सिटीमध्ये शाहरुखला डॉक्टरेट देण्यात येईल. 26 डिसेंबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखचा सन्मान केला जाणार आहे.
हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू यूनिव्हर्सिटीचा 6वा दीक्षांत समारंभ होणार आहे. यावेळी शाहरुखला गौरवण्यात येईल. सध्या शाहरुख आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रीकरणातून काही काळ बाजूला जात सोमवारी शाहरुख हैदराबादेत हजेरी लावणार आहे.