Mi Punha yein : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' (Mi Punha Yein) ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी या वेबसीरिजच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सध्या अरविंद जगताप यांची एक पोस्ट सोशल मीडियावर होत आहे. 


अरविंद जगताप यांनी लिहिलं आहे," 'मी पुन्हा येईन'. मागच्या वर्षी जुलैमध्ये मी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून केलेली ही सीरिज. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण लेखक, दिग्दर्शक म्हणून आपण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीवर पोचणं अशक्य आहे. हे एका सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिलेलं राजकारण. राजकारणात काही खरं नाही हेच खरं आहे, हे हसत खेळत सांगणारी 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज आहे. 






तगडी स्टारकास्ट असलेली वेबसीरिज


'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर मुख्य भूमिकेत आहेत. 


टीझरमध्ये काय आहे? 


टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत