Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच गरजू व्यक्तींच्या पाठीमागे उभा राहिलेला समोर आलं आहे. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत केल्याने सोनू सूद चर्चेत आला. त्यानंतर आता सोनू सूदने ग्रामीण भागातील जान्हवीला मदत केली आहे. त्याच्या मदतीमुळे 11 वर्षीय जान्हवीने अपंगावर मात केली आहे. 


कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात वाबळे वस्तीवर राहणाऱ्या जान्हवी शशिकांत वाबळे या 11 वर्षीय मुलीला बालपणापासून पाठीत कुबड असल्याने अपंगत्व आले होते. जान्हवीचे वडील शशिकांत हे पारंपारिक शेतकरी. मात्र मुलीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी उपचार केले. पण यात त्यांना यश आले नाही. अखेर पुण्यातील संचेती रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय त्यांच्या समोर आला. मात्र खर्च मोठा असल्याने ते चिंताग्रस्त झाले. 


दरम्यान तिच्याबद्दल कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते व अभिनेता सोनू सूद यांचे मित्र माजी उपनगराध्यक्ष विनोद राक्षे यांना माहिती मिळाली. त्यानंतर विनोद राक्षे यांनी क्षणाचा विलंब न करता सोनू सूद यांना या बाबत कल्पना दिली आणि रियल हिरो समजल्या जाणाऱ्या अभिनेता सोनू सूद यांनी शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलला आणि जान्हवी ला नवं आयुष्य मिळालं.


काही दिवसांपूर्वी जान्हवी शस्त्रक्रियेनंतर घरी परतली असून तिच्या चेहऱ्यावर असणारं हास्य आणि कुटुंबं समाधानी झाले आहे. आज अनेक युवक युवतींना फिल्मी अभिनेत्याच आकर्षण असतं मात्र सोनू सूद ने केवळ पडद्यावर भूमिका न निभावता खऱ्या आयुष्यात आपली सामाजिक बांधिलकी ओळखून केलेले कार्य एक आदर्श निर्माण करणारं आहे.


संबंधित बातम्या


Films Get Postponed Due To Corona : बॉलिवूडच्या पाच बिग बजेट सिनेमांना कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलल्या पुढे


Irrfan Khan Birth Anniversary : आयुष्याच्या रंगमंचावरुन अचानक एक्झिट घेणाऱ्या इरफान खानच्या 'या' आहेत गाजलेल्या भूमिका


Jhimma Movie : 'झिम्मा'चे रेकॉर्डब्रेक अर्धशतक! पन्नास दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha