Sonali Phogat : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) हत्येप्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली होती. आता पोलिसांनी एका ड्रग्स पेडलरला आणि अंजुना बीच जवळील कर्लीज हॉटेलच्या मालकाला अटक केली आहे. गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर सांगवान हा ड्रग्स पेडलरच्या संपर्कात होता. त्यानेच या ड्रग्स पेडलरची ओळख पोलिसांना सांगितली. 


कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये मिळाले ड्रग्स 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्स अढळले. सिन्थेटिक ड्रग्स हे त्या बाथरुममध्ये मिळाले, जिथे सोनाली होत्या. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली. आतापर्यंत सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. 


गोवा पोलिसांनी आतापर्यंत  कर्लीज रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयितांसह 20 ते 25 लोकांचा जबाब नोंदवला आहे.  ग्रँड लिओनी या हॉटेलमध्ये सोनाली फोगट सुधीर आणि सुखविंदर थांबले होते. त्या हॉटेलमध्ये सोनाली यांची प्रकृती ड्रग्जमुळे बिघडली. तेव्हा त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेले. ही खासगी कार हॉटेलमधील एका व्यक्तीची होती, ज्यातून हे लोक मदत मागून रुग्णालयात गेले. सुधीर आणि सुखविंदर यांनी रुग्णवाहिकेला बोलावलं नाही. 


सोनाली यांना जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं: पोलिसांची माहिती


'आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी हे सोनाली यांच्यासोबत पार्टी करताना दिसत आहेत. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्स देण्यात आले होते. सोनालीला द्रव स्वरूपात ड्रग्ज देण्यात आल्याची कबुली सुखविंदरने दिली आहे. सुखविंदर आणि सुधीर सांगवान  हे सोनाली फोगट यांच्यासोबत टॉयलेटमध्ये गेले होते, ते तिथे 2 तास थांबले. तिथे काय झाले? याची चौकशी केल्यावर सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. आम्ही सध्या चौकशी करत आहोत जेणेकरून आम्हाला अधिक माहिती मिळेल.', अशी माहिती गोवा पोलीस महासंचालक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी दिली होती. 


टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं.  


सोनाली फोगाट यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2006मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करण्यापासून केली होती. दोन वर्षांनंतर 2008मध्ये सोनाली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सोनाली भाजपच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Sonali Phogat Death : सोनाली फोगाट हत्याप्रकरणाला नवं वळण; 'जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं', पोलिसांची माहिती