Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Wedding :  शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लेक आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. सोनाक्षी आणि तिचा जहीर इकबाल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जातंय. पण या सगळ्या सध्या तरी चर्चा असून त्यावर सोनाक्षीने कोणत्याही प्रकारचं शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. त्यातच आता तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा भलत्याच चर्चांना उधाण आलंय. 


शत्रुघ्न सिन्हा यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षीच्या लग्नावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी थेट या लग्नाविषयी त्यांना कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सोनाक्षीने अद्याप याबाबत काहीही सांगितलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सोनाक्षीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तसेच जरी सोनाक्षी लग्न करणार असली तरीही तिच्या वडिलांना याबाबत कोणताही कल्पना नाही का? असाही प्रश्न निर्माण केला जातोय. 


शत्रुघ्न सिन्हा यांनी काय म्हटलं? (Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding)


मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, मी निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतच आहे. त्यामुळे अजूनतरी मी माझ्या लेकीच्या लग्नाबद्दल किंवा त्याच्या प्लॅन्सविषयी कोणाशी बोललो नाहीये. आता राहिला प्रश्न सोनाक्षी लग्न करतेय का? तर याचं उत्तर म्हणजे मला तिने याबद्दल अजूनतरी काहीही सांगितलं नाहीये. जेवढ्या बातम्या आल्या होत्या, तितकचं मी वाचलं आहे आणि तेवढच मला माहियेत. मला आणि माझ्या बायकोला जर माझ्या मुलीने विश्वासातून घेऊन सांगितलं तर आम्ही त्या दोघांना आशिर्वाद द्यायला नक्की जाऊ. ते दोघे कायम आनंदी रहावे अशीच इच्छा आहे. 


सोनाक्षी आणि जहीरच्या नात्याच्या चर्चा (Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding)


सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने 'डबल XL' नामक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं. दोघांनी आजवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सोनाक्षी आणि जहीर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 


ही बातमी वाचा : 


Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती