'तुम्ही आमची एक घेतली, आता आम्ही...' सैफ करिनाच्या लग्नानंतर लव्ह जिहादची टोळधाड, सोहा अली खान स्पष्टच म्हणाली...
सैफने 2012 मध्ये करीना कपूर सोबत विवाह केला, तर सोहा तिच्या प्रियकर कुणाल खेमू सोबत 2015 मध्ये लग्नबंधनात बांधली गेली.

Soha Ali Khan on Saif- Kareena love jihad troll: बॉलीवूडचे प्रसिद्ध पटौदी घराण्यातील इंटरफेथ लग्न कायमच चर्चेत राहिली आहेत. 1968 मध्ये बॉलीवूडची तेजस्वी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांचं प्रेम आणि लग्न हे त्या काळातील समाजाच्या काही घटकांसाठी जरी स्वीकारार्ह नसले, तरी त्याचं एकमेकांवर असलेलं प्रेम कायम होतं. शर्मिला यांनी त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वासाठी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्यांचं नाव ठेवलं आयशा सुल्ताना.
वर्षं पुढे सरकली, आणि त्यांच्या घरातली ही प्रेमविवाहाची परंपरा पुढच्या पिढीतही उमटल्याचं दिसून आलं. त्यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान यांनीही प्रेमविवाहच केला. त्यांच्या जोडीदारांचा धर्म कसा आहे, याची कधीही त्यांना चिंता नव्हती. सैफने 2012 मध्ये करीना कपूर सोबत विवाह केला, तर सोहा तिच्या प्रियकर कुणाल खेमू सोबत 2015 मध्ये लग्नबंधनात अडकली.
लव्ह जिहाद, घरवापसी, सैफ करीनाच्या ट्रोलवर सोहा म्हणाली...
जेव्हा इंटरफेथ लग्नाविषयी बोललं जातं तेव्हा काही लोकांच्या मनात अजूनही विरोध असल्याचं दिसतं. सोहा अली खानने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की, सैफ-करीनाच्या लग्नाला लोकांनी विचित्र हेडलाईन्स दिल्या ,‘लव्ह जिहाद’, ‘घरवापसी’, ‘तुम्ही आमची एक घेतली, आता आम्ही तुमची घेऊ’ त्या आजही तिला आठवतात. पण सैफ आणि करीना यांनी कोणत्याही ट्रोलपुढे झुकणं नाकारलं.
सोहा हसत म्हणाली, “मला हे सर्व ऐकून काही फरक पडत नाही. कारण ज्या लोकांवर मला प्रेम आहे, ज्यांचा मला आदर आहे, आणि जे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या निर्णयाने खुश आहेत तोपर्यंत बाकी काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. ”
आज लोक अधिक कट्टर झाले आहेत, सोहा म्हणाली..
तिने पुढे सांगितलं, “हे फक्त आमच्याबाबत नाही. जेव्हा मी आणि कुणाल लग्न केले, तेव्हाही घडलं. सैफ-करीना लग्नबंधनात बांधले गेले, तेव्हाही लोकांनी अशा विचित्र हेडलाईन्स बनवल्या; लव्ह जिहाद, घरवापसी, आणि अगदी ‘तुम्ही आमची एक घेतली, आता आम्ही तुमची घेऊ’ अशा शब्दांचा हल्ला सोशल मीडियावर सुरु होता.” सोहा अली खानने म्हणाली की, आजचा काळ आणि 60चा दशक, जेव्हा तिच्या आई-वडिलांचं लग्न झालं, यामध्ये फरक मोठा आहे. तिने म्हटलं, “मला असं वाटतं की आज लोक जरा असहिष्णु, अधिक कट्टर झाले आहेत. 60च्या दशकात लोक जरा मोकळेपणाने विचार करायचे, जरा स्वच्छंद राहायचे. ”

















