Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे (Sidharth Malhotra) फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता सिद्धार्थ मल्होत्राने रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झालेली दिसत आहे. यामुळे सिद्धार्थचे चाहते नाराज झाले आहेत. सिद्धार्थने शेअर केलेला हा फोटो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सीरिज दरम्यानचा आहे. 


रोहित शेट्टीची 'इंडियन पुलिस फोर्स' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा  'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे. सिद्धार्थने शेअर केलेला फोटो  'इंडियन पुलिस फोर्स'च्या सेटवरचा आहे.





सिद्धार्थच्या हाताला झाली दुखापत


सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोत तो दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत दिसून येत आहे. फोटोमध्ये सिद्धार्थच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. गोव्यात या वेब सीरिजचे शूटिंग होत आहे. सिद्धार्थच्या हाताला दुखापत झाल्याने या वेब सीरिजमध्ये अॅक्शनचा तडका असणार याचा अंदाज येत आहे. सिद्धार्थच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. 


'इंडियन पुलिस फोर्स' ही रोहित शेट्टीची आगामी वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. रोहितचे चाहते आता 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत. रोहितने 'सिंघम', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे ओटीटीवर रोहित पदार्पण करत असल्याने चाहते चाहते आनंदी झाले आहेत. 


'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीने एक खास व्हिडीओ शेअर करत 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजची घोषणा केली आहे. या वेबसीरिजमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा


Indian Police Force : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये विवेक ऑबेरॉयची एन्ट्री; शेअर केली पोस्ट