Siddharth Anand On Pathaan 2 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पहिल्या भागाला मिळत असलेल्या यशानंतर सिद्धार्थने आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'पठाण 2'ची (Pathaan 2) घोषणा केली आहे. 


सिनेमाच्या यशानंतर 'पठाण' सिनेमाच्या टीमने आज प्रसार माध्यमांशी संवाद झाला आहे. दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'पठाण 2'ची घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही आणखी एक पर्वणी असेल.


'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. एकीकडे या सिनेमावर टीका होत असताना दुसरीकडे शाहरुखच्या चाहत्यांनी मात्र आपल्या लाडक्या सेलिब्रिटीवरच्या प्रेमात कुठेही कमीपणा जाणवला नाही. 


'पठाण 2' मध्ये काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 'केजीएफ 2', 'बाहुबली 2' प्रमाणे चाहते आता 'पठाण 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण 2'मध्ये शाहरुखचा नवा अंदाज पाहायला चाहते उत्सुक आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सिद्धार्थ आनंद सांभाळणार असून यशराजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे. 






'पठाण'ची उत्सुकता शिगेला!


सिद्धार्थ आनंदने 'पठाण 2'ची घोषणा केल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली उत्सुकता दर्शवत आहेत. 'पठाण'प्रमाणे 'पठाण 2'साठी देखील आम्ही तुला पाठिंबा देऊ अशा आशयाच्या पोस्ट शेअर करत आहेत. अद्याप 'पठाण 2'च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. 'पठाण 2'मध्येदेखील भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलक दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला


शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लमबध्ये सामील झाला आहे. 


संबंधित बातम्या


लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला