Shilpa Shetty Reaction : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीनं सोडलं मौन; म्हणाली...
Shilpa Shetty First Reaction : पॉर्नोग्राफिक फिल्म बनवल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

Shilpa Shetty First Reaction : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा ठपका ठेवत व्यावसायिक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशातच पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीनं या मुद्द्यावर आपलं मौन सोडलं आहे. यासाठी शिल्पानं सोशल मीडियाचा सहारा घेतला आहे. नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या शिल्पा शेट्टीनं पतीच्या अटकेनंतर सोशल मीडियापासून दूर राहणचं पसंत केलं होतं.
शिल्पा शेट्टीची पोस्ट व्हायरल
शिल्पा शेट्टीनं गुरुवारी रात्री आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एका पुस्तकाचा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यामधये लिहिलं आहे की, "रागात मागे वळूण पाहू नका किंवा घाबरुन पुढे पाहू नका, तर जागरुक म्हणून पाहा."
यामध्ये पुढे लिहिलं आहे की, "आपण रागानं मागे वळून पाहतो. ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं, ज्यांनी आपल्याला निराश केलं, जे दुर्भाग्य आपण सहन केलं. आम्ही संभाव्यतेच्या भीतीने वाट पाहत आहोत की, आपण आपल्या नोकर्या गमावू शकतो, एखाद्या आजाराचे संकलन करू शकतो, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला बळी पडू शकतो. आपल्याला ज्या स्थानी राहण्याची गरज आहे, ते इथेच आहे, सध्या जे होत आहे, किंवा काय होऊ शकतं, त्याला उत्सुकतेनं पाहत नाही, तर पूर्णपणे जागरुक राहून पाहतोय."
पोस्टमध्ये पुढे लिहिलण्यात आलं आहे की, "मी एक दीर्घ श्वास घेते.. माझ्या जिवीत असण्याबद्धल ते समाधान असतं... मी यापूर्वीही आव्हानांचा सामना केलाय, यापुढेही करत राहीन.. माझ्या आजच्या जगण्यावर मी त्याचा परिणाम होऊ देणार नाही"
शिल्पा शेट्टीनं पुस्तकाचा हा अंश शेअर करताना कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. पण सध्याच्या परिस्थिती शिल्पा स्वतःला कसं सांभाळत आहे, हे तिच्या या स्टेटसमधून स्पष्ट होतंय. दरम्यान, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी पॉर्नोग्राफिक फिल्म बनवल्या प्रकरणी अटक केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य
- Raj Kundra : 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक
- Raj Kundra Whatsapp Chat : पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी राज कुंद्राकडे रेडी होता 'Plan B'; पीएच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा























