Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता शिझान खानने तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. 






वालीव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी शिझानच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शिझानला त्याचं गुगल अकाऊंट (Google Account) आणि मेल आयडीचा पासवर्ड आठवत नाही आहे. पण पोलिसांना त्याचं इमेल (Email Id) अकाऊंटदेखील तपासायचं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शिझानला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. 


शिझानचे वकील म्हणाले,"गेल्या सात दिवसांपासून शिझान पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याचा फोनदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. अशातच आता वसई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे". 


शिजानच्या वकिलांनी यावेळी त्याचे केस कापू नये, पोलीस सुरक्षा मिळावी, मीडिया ट्रायल चालवू नये, त्याला घरचं जेवण आणि औषध मिळावी, अशी मागणी केली होती. त्यात घरचं जेवण आणि औषधाबाबत न्यायलयानं संमती दर्शवली तर 2 तारखपर्यंत केस न कापण्याचे जेल प्रशासनाला आदेश दिलेत.  


नेमकं प्रकरण काय? 


हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


संबंधित बातम्या


Sheezan Khan : शिझान खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी; वकीलांची माहिती