अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ बॉलिवूडचा किंग शाहरुखनं देखील ट्विटरवरुन या घटनेचा निषेध केला. 'निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना.'
दरम्यान या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनंही दु:ख व्यक्त केलं आहे. 'अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे', असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 12 भाविक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला होता.