Film On Seema Haider And Sachin: पाकिस्तानची   सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) हे  जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांची लव्ह स्टोरी आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.  ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटात  सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘कराची टू नोएडा’ (Karachi to Noida Movie)   या चित्रपटाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे.


सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर  अधारित असणाऱ्या 'कराची टू नोएडा' या चित्रपटाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार असून जानी फायरफॉक्स बॅनर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नुकताच 'कराची टू नोएडा' या चित्रपटाच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन कलाकार हे कॅमेऱ्यासमोर ऑडिशन देताना दिसत आहेत. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा व्हिडीओ:






'कराची टू नोएडा' या चित्रपटामध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.


दिग्दर्शक अमित जानी यांनी  सीमाला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी सीमा हैदरला 'अ टेलर मर्डर स्टोरी' (A Tailor Murder Story) या चित्रपटाची ऑफर दिली आहे. या चित्रपटातील रॉ एजंटची भूमिका साकारण्याची ऑफर अमित जानी यांनी  सीमाला दिली होती. 


सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून देशातच नाही तर परदेशात देखील होत आहे.  सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Yashraj Mukhate New Song: 'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका..'; यशराज मुखाटेचं नवं गाणं, व्हिडीओ व्हायरल