Sara Ali Khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच आपली छाप सोडली आहे. साराच्या नावावर काही हिट चित्रपटांची नोंद आहे. तर, काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सारा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग असलेली सारा अनेकदा तिच्या दररोजच्या दिनक्रमाची  माहिती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. साराने अशीच एक घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.साराच्या पोटाला भाजले असल्याचे समोर आले आहे.  याबाबत तिनेच ही माहिती दिली. 


साराने शेअर केला व्हिडीओ 


 सध्या सारा अली खान तिच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशा स्थितीत प्रमोशनदरम्यानच त्यांच्या पोटाला भाजले असल्याचे समजते. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे. 


या व्हिडिओमध्ये सारा मेकअप रूममध्ये दिसत आहे. ती कूल आणि आनंदी मूडमध्ये असून तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाबद्दल सांगते. जखमी होऊनही तिने प्रमोशनच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्यामुळे सारावर तिचे मदतनीस चांगलेच नाराज झाले आहेत. 






कसे भाजले साराचे पोट


सारा अली खानने म्हटलेत की,'जेव्हा तुम्ही दोन चित्रपटांचे प्रमोशन करत असता, तेव्हा  असा गोंधळ होतो. आता काय करायचं, पोटाला भाजलंय, मला उशीर झालाय आणि सगळ्यांना थांबावं लागलं. 






हा व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'साराच्या रेडिओवर तुमचे स्वागत आहे. आजच्या ताज्या बातम्या, मी भाजले, काय करावे याचा धडा घेतला. साराचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते खूपच नाराज दिसत आहेत. तसेच साराला लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


 इतर संबंधित बातमी :