Sara Ali Khan Weight Loss Tips : 'केदारनाथ' (Kedarnath) आणि 'सिन्बा' (Simba) सारख्या सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या सारा अली खानचा (Sara Ali Khan) मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कमी वयात ती आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. सिनेमांत काम करायला सुरुवात केली तेव्हा साराचं वजन 96 किलो होतं. पण दीड वर्षात तिने तब्बल 40 किलो वजन कमी केलं आहे. जाणून घ्या सारा अली खानच्या वेट लॉस टिप्सबद्दल.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना सारा अली खानचं वजन 96 किलो होतं. कॉलेज संपल्यानंतर सारा अली खान भारतात आली तेव्हा तिची आई अमृता रावला तिला ओळखताही येत नव्हतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सारा अली खानने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. साराने असं ठरवलं होतं की, वजन कमी केल्याशिवाय ती तिच्या आईसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणार नाही.
सारा अली खानचं डाएट काय होतं? (Sara Ali Khan Diet)
सारा अली खानला पिज्जा, आईसक्रीम, चॉकलेट, मुंबईची पाव भाजी आणि बेसन लाडू प्रचंड आवडायचे. वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साराने जंकफूड खाणं पूर्णपणे बंद केलं. पिज्जाच्या जागी सॅलेड खाण्याचा तिने निर्णय घेतला. तसेच कमी कॅलरीज असणारे पदार्थ खाण्यास तिने सुरुवात केली.
सारा अली खानचा फिटनेस मंत्र (Sara Ali Khan Fitness)
वजन कमी करण्यासाठी डाएट सांभाळण्यासोबत साराने जिममध्ये घाम गाळला. तसेच वेट लॉससाठी तिने पिलाटिस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केली. तसेच टेनिस हा क्रीडाप्रकार खेळण्यावर तिने भर दिला. वजन जलदगतीने कमी करण्यासाठी तिला स्पोर्ट्सने मदत केली.
साराचा रविवारी असायचा चीट डे
फिल्म फेअर अवॉर्ड्समध्ये फिटनेसबद्दल बोलताना सारा अली खान म्हणाली की,"जास्त वर्कआऊट करणं अयोग्य आहे. सुरुवातीला मी आठवड्याचे सात दिवस वर्कआऊट करत असे. पण तरीही माझं वजन कमी होत नव्हतं. त्यामुळे माझी ट्रेनस नम्रता पुरोहितने मला सहा दिवस वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला होता. तर रविवारचा दिवस माझ्यासाठी चीट डे असायचा. रविवारी मी वर्कआऊट न करण्यासोबत माझ्या आवडीच्या गोष्टी खायची.
वजन कमी करण्यासाठी सारा अली खानने खूप मेहनत घेतली आहे. डाएट, वर्कआऊट आणि स्किन केअर रुटीनबद्दल ती खूप जागृत होती. साराने 40 किलो वजन कमी करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. आजही चाहते त्याचं कौतुक करतात. सारा सध्या आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसून येते.
संबंधित बातम्या